कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड येथील वस्त्रांतर गृह पाडकामाला वेग
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड येथील वस्त्रांतर गृह पाडकामाला वेग
img
दैनिक भ्रमर


नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृत स्नान करिता येणाऱ्या साधू महंत व देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहेत. या अनुषंगाने रामतीर्थ, रामकुंड परिसरातील जुने वस्त्रांतर गृह पाडण्याचे काम दिवसरात्र वेगाने सुरू आहे.

आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले असून, साधू महंत आणि भाविकांना स्नान, वस्त्रांतर, धार्मिक विधी तसेच स्वच्छता यासाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

कुंभमेळा कालावधीत देश परदेशातुन लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेता, परिसरातील गर्दीचे नियोजन, वाहतूक सुलभता, सुरक्षा व्यवस्था, तसेच गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण यांसाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

या कामाच्या माध्यमातून नियोजन बद्ध टिकाऊ आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे कुंभस्नानाचा अनुभव भाविकांसाठी अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल असे नियोजन केले जाणार आहे.

आयुक्त खत्री यांनी मनपाच्या संबंधित विभागांना कामात गुणवत्ता, गती आणि समन्वय राखण्याच्या सूचना दिल्या असून, नियोजित वेळेत काम पूर्ण होण्यासाठी सतत त्या रामतीर्थ,तपोवन व शहरात इतर परिसराची पाहणी अधिकाऱ्यां समवेत करीत आहे.

 “कुंभमेळा नियोजन भाविकांसाठी सुकर, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करणे” — असा आहे, आणि त्या दिशेने सर्व विभाग तातडीने कार्यरत राहतील असे निर्देश आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Join Whatsapp Group