
अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विनोदी अभिनेते असरानी यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गोवर्धन असरानी असे त्यांचे नाव होते.
हिंदी सिनेसृष्टीत बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर अजरामर ठरल्या.
शोले चित्रपटात त्यांनी साकारेलल्या जेलरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यांच्या जाण्याने सिनेजगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीर्घकाळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते. मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील ते रहिवासी होते. त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.