अंबोली घाटात बसचालकाला लागली डुलकी; बस दरी जवळ आली अन्...
अंबोली घाटात बसचालकाला लागली डुलकी; बस दरी जवळ आली अन्...
img
दैनिक भ्रमर


सातपूर – महापालिका निवडणुका जवळ आल्याने उमेदवार मतदारांना खुश करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत.

काहींना दिवाळी भेटवस्तू, काहींना प्रवास तर काहींना देवदर्शनाच्या सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच एका उपक्रमाअंतर्गत प्रभागाचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी ५० ज्येष्ठ नागरिकांसाठी जव्हार-सिलवासा येथील दुधनी पर्यटन सहलीचे आयोजन केले होते.

शनिवार (दि. ११) एक वाजता सातपूरहून पन्नास सीटर बसने ही सहल सुरू झाली. दुपारी अंदाजे अडीच वाजेच्या  सुमारास बस अंबोली घाट परिसरात पोहोचली असता, चालकाला अचानक डुलकी लागल्याने बसचा ताबा सुटला. बस दरीकडे झुकत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाला.

बसमधील ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरड केल्याने चालक तात्काळ जागा झाला आणि प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगारावर वळवून थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा बस थेट दरीत कोसळण्याची शक्यता होती.

या घटनेत सुखदेव आंधळे हे ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना तत्काळ सातपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते उपचार घेत आहेत.

या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, चालकाच्या जागरूकतेमुळे आणि प्रवाशांच्या संयमामुळे ५० ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचला, ही बाब दिलासादायक ठरली आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Join Whatsapp Group