आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीस सुरुवात सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये राजकीय वारे देखील वाहत आहेत. अशातच सिन्नरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. भारत कोकाटे यांनी मशाल सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे धाकटे बंधू भारत कोकाटे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 'जय महाराष्ट्र' करत पक्षाला रामराम केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे
भारत कोकाटे सध्या सिन्नर येथील सोमठाणेच्या सरपंचपदी काम करीत आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर भारत कोकाटे यांनी काम केलं आहे. भारत कोकाटे यांनी २०२२ साली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश केला होता.