हॉटेल व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांना अटक
हॉटेल व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांना अटक
img
दैनिक भ्रमर
हॉटेल व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी तसेच हॉटेलच्या मॅनेजरला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींपैकी पाच जणांना अटक केली आहे.  


प्रवीण सुकलाल कुमावत (रा. घर नंबर ४६१०, क्रांतीनगर, उदय कॉलनी, मखमलाबाद, पंचवटी, नाशिक), बाबासाहेब शिवाजी बढे (रा. मारुती मंदिरामागे, तळेनगर, पंचवटी, नाशिक), राहुल मगनलाल जैन (रा. सी 503, हरिओम सोसायटी, इंदिरानगर, नाशिक), प्रकाश पांडुरंग गवळी (रा. घर नंबर ४४३४, पांडुरंग निवास, कृष्णा हॉटेल शेजारी, मालेगाव स्टँड, पंचवटी, नाशिक) व योगेश हिम्मतराव पवार (रा. साई अपार्टमेंट, वामन डेरीच्या पाठीमागे, शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा देखील शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group