नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या"भागात उद्या वीज पुरवठा बंद राहणार
img
वैष्णवी सांगळे
नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही मुक्तीधाम विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ई बस चार्जिंगसाठी नवीन उच्चदाब केबल जोडणीचे  काम करण्यात येणार असल्याने शनिवार (दि. १८ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुक्तिधाम (देवळाली) विद्युत उपकेंद्र अंतर्गत वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 


मुक्तीधाम या विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्य  बिटको, लॅम रोड, दत्त मंदिर, आनंदनगर, देवळालीगाव व सुभाष रोड या ११ केव्ही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये  दत्तमंदिर, जगताप मळा, वडनेर रोड, देवळाली गाव,विहितगाव,शिवसमर्थनगर,जुनौद्दीन डेपो,गांधी पुतळा,पवार वाडी,सुभाष रोड,गवळी वाडा, खोले मळा आणि चव्हाण मळा  या परिसराचा समावेश असणार आहे.

सदर काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीज पुरवठा अगोदर सुरू करण्यात येईल, तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group