
नाशिक :- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्रातील ३३ केव्ही गोविंद नगर या वाहिनीवर केबल जोडण्यासाठी तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने बुधवार (दि. १५ ऑक्टोबर) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिवाजीवाडी (इंदिरानगर) विद्युत उपकेंद्रातील वाहिनीवरील वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शिवाजीवाडी या विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या खालील ११ केव्ही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये दीपाली नगर, शनी मंदिर, कल्पतरु नगर, भारत नगर,भाभा नगर व क्युरी मानवता तसेच गोविंद नगर विद्युत उपकेंद्रातील ११ केव्ही कालिका वाहिनी याचा समावेश असेल.
हे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.