बापरे ! प्रकाश लोंढे यांच्या घरझडतीत सापडला भुयारी मार्ग
बापरे ! प्रकाश लोंढे यांच्या घरझडतीत सापडला भुयारी मार्ग
img
दैनिक भ्रमर
नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयाच्या घरझडतीत भुयारी मार्ग सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रकाश लोंढे याच्या कार्यालयात पोलिसांना तपास करताना ही गोपनीय खोली आढळून आली. हा भुयारी मार्ग पाहून पोलिसही चक्रावले. 


गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या नाशिक पोलीस प्रकाश लोंढे याची कसून चौकशी करत आहेत. केवळ गोळीबार प्रकरणच नव्हे, तर लोंढे टोळीवर यापूर्वी दाखल असलेल्या इतर गंभीर गुन्ह्यांचीही पोलीस नव्याने तपासणी करत आहेत.

या गुन्ह्यातील आरोपी भूषण लोंढे हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. लोंढे यांच्या कार्यालयात छुपी खोली सापडल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला असून, या खोलीचा वापर कशासाठी केला जात होता, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने लोंढे टोळीच्या सर्व बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घरझडती दरम्यान पोलिसांनी तेथे आढळलेली हत्यारे देखील जप्त केली आहेत. 
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Join Whatsapp Group