
१२ ऑक्टोबर २०२५
माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांनी त्यांची आता झाडाझडती सुरू केली असून काल त्यांच्या कार्यालयाची घरझडती घेण्यात आली.
या घरझडतीवेळी त्या कार्यालयात भुयारी मार्ग पाहून पोलीसही अवाक झाले. पोलिसांनी लोंढे यांना स्वतःला हा भुयारी मार्ग उघडून दाखवण्यास सांगितला.
यावेळी पोलिसांना कार्यालयात प्राणघातक शस्त्रे, पंचवीस हजार रुपये रोख, दारूचा साठा आढळला. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या असून सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करण्यासाठी तेथील डीव्हीआर ताब्यात घेतलेला आहे.
या सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून आणखी कसला उलगडा होतो हे आता येत्या काळात समजेल.
Copyright ©2025 Bhramar