
२१ ऑक्टोबर २०२५
त्र्यंबकेश्वर (सतीश दशपुत्रे) :- नाशिक त्र्यंबक रस्ता रुंदीकरणासाठी एनएमआरडीएने नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील बांधकामे पाडून स्वयंरोजगार निर्माण करणा-या शेतक-यांना बेरोजगार केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला.
आज सकाळी अंजनेरी शिवारातील बेझे फाटा येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महिलांनी आक्रोश करत काळी दिवाळी साजरी केली. शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाहीत, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
एनएमआरडीएच्या नावाने रस्त्यापासून दुर अंतरावर अवास्तवर हद्द तयार करून शासनाने शेतक-यांना बेघर, भूमिहिन करण्याच्या प्रकाराचा काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला बळ देण्यासाठी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.
यावेळी सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे तीन तास आंदोलन सुरू होते. दोन्ही बाजूने सुमारे तीन ते चार किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Copyright ©2025 Bhramar