नाशिक : घरमालकाकडे मागितली दहा लाख रुपयांची खंडणी, दोन जणांविरुद्ध गुन्हा
नाशिक : घरमालकाकडे मागितली दहा लाख रुपयांची खंडणी, दोन जणांविरुद्ध गुन्हा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भाडेतत्त्वावर घेतलेला फ्लॅट खाली करून पाहिजे असेल, तर दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक केशवराव ढुबे (वय 63, रा. दोनवाडे, ता. जि. नाशिक) यांचा शेतीव्यवसाय असून, उपनगर येथे संघमित्रा हौसिंग सोसायटीजवळ दत्तप्रसाद बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. आरोपी शिबू अन्थोनी जोसेफ व प्रियंका अतुल सोनवणे यांनी भाडेतत्त्वावर हा फ्लॅट घेतला आहे. हा फ्लॅट बळकावण्याच्या इराद्याने आरोपींनी भाडेतत्त्वावर घेतला. 

हा फ्लॅट खाली करून पाहिजे असेल, तर दहा लाख रुपये द्यावे लागतील. तरच हा फ्लॅट खाली करून मिळेल, असे शिबू जोसेफ व प्रियंका सोनवणे यांनी सांगितले, तसेच फिर्यादीला प्रियंका हिने खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये सडवीन व तिचे पंटर तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी देऊन खंडणी मागितली.

 हा प्रकार दि. 23 ऑगस्ट रोजी उपनगर येथे राहत्या फ्लॅटमध्ये घडला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शिबू जोसेफ व प्रियंका सोनवणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group