छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या आश्रमात शुक्रवारी रात्री महिला कीर्तनकारची आश्रमात घुसून दगडाने ठेचू हत्या करण्यात आली आहे. आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळखळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , महाराज ह.भ.प. संगीताताई पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. महिला कीर्तनकाराची दडगाने ठेचून हत्या होणं, ही गंभीर बाब आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.
ह.भ.प. संगीताताई महाराज यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समजताच वैजापूर आणि संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
संगीताताई महाराज यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैजापूर पोलिसांकडून हत्येचा तपास करण्यात येत आहे. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
श्वानपथक घटनास्थळी पोहचले आहे. ह.भ.प. संगीताताई महाराज यांची हत्या का केली? कुणी केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून आश्रमात चौकशी कऱण्यात येत आहे. श्वनपथकाकडून पुरावे शोधण्याचे काम करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अज्ञाताचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.