धक्कादायक : हनिमूनवर असताना पत्नीनेच का घडवली इंदूरच्या राजाची हत्या , 'हे' कारण आलं समोर
धक्कादायक : हनिमूनवर असताना पत्नीनेच का घडवली इंदूरच्या राजाची हत्या , 'हे' कारण आलं समोर
img
Dipali Ghadwaje
इंदूरच नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची हत्या आणि पत्नी सोनम रघुवंशीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील नंदगंजमध्ये एका ढाब्याजवळ सापडली. तिला ताब्यात घेण्यात आलय. सोनमनेच ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात दोन आरोपींना इंदूरमधून अटक करण्यात आली.

एक आरोपी उत्तर प्रदेशचा राहणारा असून तो फरार आहे. लग्नानंतर मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेल्या या जोडप्यातील पती राजाची निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी सोनम बेपत्ता होती. राजाचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. या प्रकरणात सगळच संशयास्पद होतं. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पत्नी सोनमच या भयानक हत्याकांडामागे असल्याच स्पष्ट झालय.

सोनम रविवारी 3 ते 4 दरम्यान गाजीपूर नंदगंज येथे एका ढाब्याजवळ पोहोचली. ढाबे वाल्याच्या फोनवरुन भाऊ गोविंद रघुवंशीला व्हिडिओ कॉल केला. त्याला गाजीपूर येथे असल्याच सांगितलं. गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना कळवलं. त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला. ढाबेवाल्याने सुद्धा इमर्जन्सी नंबर 112 वर कॉल केला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं व वन स्टॉप सेंटर येथे ठेवलं.
 
राजाची हत्या करण्यामागच कारण काय?

पोलीस तपासात समोर आलं की, लग्नाआधी सोनमचे राज कुशवाह नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळेच तिने राजा रघुवंशीच्या हत्येची योजना बनवली. मेघालयच्या शिलॉन्ग येथे 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी गेले. राजा आणि सोनम 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील एका गावात होम स्टेसाठी थांबले. तिथून चेकआऊट केल्यानंतर दोघे बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरिम येथे बेवारस स्थितीत आढळली. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याने राजाची हत्या झाल्याच स्पष्ट झालं.

या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली होती. आतापर्यंत तीन आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होतील. कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घरवापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करत होते. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group