धक्कादायक ! किरकोळ वादातून एसटीच्या चालक-वाहकाला चार तरूणांकडून बेदम मारहाण
धक्कादायक ! किरकोळ वादातून एसटीच्या चालक-वाहकाला चार तरूणांकडून बेदम मारहाण
img
नंदिनी मोरे
आजकाल दादागिरी , हाणामाऱ्या तसेच अनेक प्रकारचे गुन्हे देखील वाढत आहेत. किरकोळ वादातून अनेक गंभीर घटना उघडताना दिसत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे. एसटीच्या चालक-वाहकाला चार तरूणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

 टाटा मॅजिकमधील चार ते पाच युवकांनी बस समोर टाटा मॅजिक आडवी लावून चालक आणि वाहकाला मारहाण केली.एसटीला साइट देत नसल्याने तसेच सतत हॉर्न वाजवत असल्याने यवतमाळवरून अमरावतीकडे एसटी बस जात असताना टाटा मॅजिक मधील चार ते पाच युवकांनी बससमोर टाटा मॅजिक आडवी करून मारहाण केली.

तुम्ही सतत हॉर्न का वाजवला?असे विचारीत चार तरुणांनी एसटी बसमध्ये राडा घातला. या घटनेमुळे बसमधील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटफळी दोडकीच्या हनुमान मंदिर जवळील ही घटना आहे.नेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वाहकांच्या हातातील १० हजार ३६० रूपये कोणीतरी चोरून नेले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दरोडा टाकणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर, शुभम जगताप असे मारहाण करणाऱ्या तरूणांची नावे असून चौघांविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group