पाथर्डी फाटा येथे दोन संशयितानी एका इसमावर किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाकेराव डेमसे हे आपल्या गाडीने जात होते. त्यावेळी गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे दोन जणांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच्या जवळ कोयता देखील होता.
तो त्याने उगारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघा संशयीतांपैकी एकाने गाडीवर दगड टाकत काचा फोडल्या. तसेच हातात कोयता घेऊन बाकेराव डेमसे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाकेराव डेमसे हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मदन डेमसे यांचे वडील आहेत.
भरदिवसा हा प्रकार होत असताना नागरिक मध्ये न पडता फक्त बघ्याची भूमिका घेत होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस अधिक माहिती घेत आहेत.