नाशिक :- पोलीस कॉन्स्टेबलेने विवाह केल्याचा बहाणा करून एका 25 वर्षीय युवतीवर विविध ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी हा नाशिकच्या म्हसरूळ परिसरात राहतो. पीडित युवती व आरोपी 35 वर्षीय इसम यांची सन 2020 मध्ये ओळख झाली. नंतर गटाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्याने तिच्याशी खासगीत लग्न करून दिखावा केला. परंतु तो तिला नांदवायला घेऊन न जाता तिच्यावर सन 2020 ते 25 मार्च 2025 या कालावधीत लैंगिक अत्याचार करत राहिला. ती सासरी न राहता तो तिला माहेरीच ठेवायचा व नंतर पीडितेच्या घरच्यांची विवाहाला संमती नाही असे सांगून त्याने तिची फसवणूक केली आणि सन 2023 मध्ये हक्क सोडपत्र करून घेतले.
नंतर त्या पीडितेचा विवाह 15 डिसेम्बर 2024 रोजी झाला आणि ती सुखी संसारात रमू लागली होती. काही दिवसांनी आरोपी पीडितेला व तिच्या पतीला गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. तसेच तो तिच्या कडे शरीर सुखाची मागणी करू लागला. तिचा बळजबरीने पाठलाग करून त्याने पीडितेच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध केले.
अखेर या गोष्टीला कंटाळून पीडितेने त्याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.