नाशिक - चैत्र महिन्यामध्ये पुन्हा एकदा नाशिक तापलं असून नाशिकचे तापमान 41 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे.
मुळे या हंगामातला सगळ्यात जास्त गरम असलेला मंगळवार नाशिकवासियांना सहन करावा लागला आहे.
चैत्र महिन्यामध्ये सुरुवातीला तापमान वाढले होते त्यानंतर मागच्या आठवड्यात चार दिवस बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती . त्यानंतर तापमानामध्ये काहीसा बदल झालेला होता पण आता पुन्हा एकदा नाशिक शहराचे तापमान हे 41 अंश डिग्री सेल्सिअस पार केले आहे. रविवारी रामनवमीच्या दिवशी नाशिकचे तापमान हे 41 अंश डिग्री सेल्सिअस वरती पोहोचले आहे . नाशिकचे किमान तापमान ही 21 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले आहे तर मालेगावचे तापमान हे 42.5 अंश डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे.. त्यामुळे या हंगामातील सगळ्यात गरम मंगळवार नोंदविला गेला आहे
मनमाड शहरासह नांदगावं तालुक्यात तापमानात मोठी वाढ..पारा 41 अंशांवर..आरोग्य विभाग अलर्ट मोडवर..
उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आला उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे.