लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
चंद्रशेखर गोसावी


नाशिक :- लाच घेताना इगतपुरी तालुक्यात महिला अधिकाऱ्यासह आणखी एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

सौ. योगिता धुराजी कचकुरे (वय 42, ग्राम महसूल अधिकारी, सजा - मोडाळे, ता. इगतपुरी जिल्हा- नाशिक रा. सोमेश्वर कॉलनी, प्लॉट नंबर 3, ABB कंपनी जवळ, सातपूर, नाशिक) व दत्तात्रय मनोहर टिळे (वय 35, मंडळ अधिकारी, वडिवऱ्हे ता. इगतपुरी जिल्हा- नाशिक, रा. 625, टिळक पथ, भगूर, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची नावे आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आई वडील यांच्या नावे मौजे मोडाळे, ता इगतपुरी  जि - नाशिक येथे गट क्रमांक - 636 (0.60 आर) मिळकत आहे. या मिळकतीच्या गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) यावर इतर अधिकार यामध्ये मे. न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद क्रमांक 1068 अन्वये नोंद होती.

या बाबत 5 वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक यांच्या कडे special civil suit No. 412/2012 दाखल होता. या दाव्यात दिनांक 12/02/2015 रोजी निकाल लागून Spl. C.S. No. 412/ 2012 stands dismissed for want of prosecution. Proceeding stands closed. असे आदेश झाले होते.

त्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांनी तहसीलदार, इगतपुरी, नाशिक तसेच आरोपी योगिता कचकुरे यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाही करुन न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदरील नोंद रद्द होण्यासाठी नोंद घेण्याच्या मोबदल्यात आरोपी योगिता कचकुरे  यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी करुन मागणी केली.

लाचेची रक्कम ही स्वीकारली तसेच टिळे यांनी सदरील नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात 5000 रुपये लाचेची मागणी स्वतः साठी केली म्हणून कचकुरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group