पावसामुळे वीज पडून सिन्नरला युवकाचा मृत्यू, चार तासांमध्ये 30 मिलिमीटर पाऊस
पावसामुळे वीज पडून सिन्नरला युवकाचा मृत्यू, चार तासांमध्ये 30 मिलिमीटर पाऊस
img
चंद्रशेखर गोसावी


नाशिक - जिल्ह्यामध्ये आज झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर शहरामध्ये विविध ठिकाणी वीज मंडळाच्या वाहिनी वर झाड कोसळल्याने सायंकाळच्या वेळी अर्धे शहर हे अंधारात बुडाले होते.

वेधशाळेने पुन्हा नाशिक शहराला पावसासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपासून साडेआठ वाजेपर्यंत सुमारे 30.6 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झालेली आहे. या चार तासांमध्ये अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे.

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा दणका सातत्याने चालू आहे. त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे सिन्नर तालुक्यातील सोनगिरी या गावामध्ये रवींद्र प्रभाकर बोडके नामक 34 वर्षीय युवक हा वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडला आहे

नांदगाव तालुक्यातील मौजे कुसुमतेल येथील बाळू ढवळू मेंगाळ यांचा बैल आजच्या पावसात वीज  पडून मयत झाला.
कळवण तालुक्यातील भेंडी गावात शांताराम भाऊराव साळवे यांच्या घराचे पत्रे उडाले असून नुकसान झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group