ऑपरेशन सिंदूर यशस्वी पूर्ण केल्याबद्दल NCF तर्फे भारतीय सैन्याला कळसुबाई शिखरावर विशेष सलामी
ऑपरेशन सिंदूर यशस्वी पूर्ण केल्याबद्दल NCF तर्फे भारतीय सैन्याला कळसुबाई शिखरावर विशेष सलामी
img
दैनिक भ्रमर
पेहलगाम येथे दहशतवादी संघटनांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार केला, व निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

याचे सडेतोड उत्तर देण्यासाठी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 7 मे रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे उध्वस्त केले. हे मिशन यशस्वीरित्या राबविल्या बद्दल आपल्या भारतीय सैनिकांना सलामी देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी समुद्रसपाटीपासून 1646 मीटर अंतरावर असलेले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई शनिवारी रात्री सर केले व रविवारी पहाटे सकाळी सर्वांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पेहराव परिधान करून सामुदायिक राष्ट्रगीत कळसुबाई शिखरावर अभिमानाने गायले व भारतीय सैनिकांना अनोखी सलामी दिली.

या उपक्रमात रविवारच्या सुट्टी निमित्त कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात हौशी ट्रेकर्स उपस्थित होते. सर्वजण स्वतःहून यामध्ये सहभागी झाले व देश प्रेम दाखवले.
 
या मिशनमध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, माजी खजिनदार रवींद्र दुसाने, उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ, संचालक माधुरी गडाख, आत्तापर्यंत तब्बल 242 वेळा कळसुबाई शिखर मोहीम फत्ते करणारा रतन अंकोलेकर, दविंदर भेला, साधना दुसाने, डॉ. नितीन रौंदळ, विजय गडाख, जाकिर पठाण ,वैशाली शेलार, परमजीत भेला , ईशान भेला, पार्थ गडाख, प्रियंका माने, दीक्षा दुसाने हे सहभागी झाले होते. 

जाती धर्म जरी वेगळे आहेत पण आम्ही सर्व भारतीय एक आहोत ...,"विविधता मे एकता " हा संदेश दिला. सर्व नाशिक सायकलिस्ट  फाउंडेशन च्या सदस्यांनी ट्रेकिंग करताना आपल्या हातात संदेश बोर्ड घेतले होते."मेरा देश ,मेरा अभिमान" ,,"जय जवान जय किसान","भारत माता की जय","ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जवानांना सलाम" हे संदेश हजारो ट्रेकर्सला दिले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group