पाथर्डी फाट्या जवळ 19 वर्षीय युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
पाथर्डी फाट्या जवळ 19 वर्षीय युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
img
Prashant Nirantar

इंदिरानगर :- चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका 19 वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर घडली आहे.

रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जखमी व गाला स्थानिक नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश लाटे (वय 19, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी) असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे. 

घटनेची माहिती मिळतात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा फौजा फाटा घटनास्थळी दाखल झाला. मारहाण करणाऱ्या संशयतांची काही नावे पोलिसांना समजली असून पोलिसांची विविध पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आली आहे.

जुन्या वादाच्या कुरापतीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group