गरोदर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा पतीने केला खून
गरोदर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा पतीने केला खून
img
दैनिक भ्रमर
काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या गरोदर महिलेच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमृता कुमारी विकीराय यादव (वय १९) हिचा खून तिच्या पतीनेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विकी राय यादव याने चारित्र्यावर संशय घेऊन अमृताचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांचे विशेष योगदान दिले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता अहिल्याबाई होळकर पुलाजवळून बेपत्ता झाल्याचे वृत्त आल्यानंतर एलसीबी आणि तालुका पोलीसांनी तपास सुरू केला होता. सुरुवातीला विकी राय यादव यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

पोलीस निरीक्षक आमले यांनी केलेल्या कसून चौकशीत, आणि सुर्वे यांनी मिळवलेल्या महत्वाच्या माहितीच्या आधारे, विकीनेच अमृताला गोदावरी नदीच्या काठी फिरायला नेण्याच्या बहाण्याने झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. ती गरोदर पण होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group