नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक शहरात रंगाचा भंग झाला. पूर्व वैमन्यासातून दोन सख्ख्या भावाची हत्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत समजलेली माहिती की, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश (मन्ना) जाधव व प्रशांत जाधव या दोन भावांवर त्यांच्या घरासमोर तेथीलच राहणाऱ्या टोळक्याने धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात या दोन्ही बांधवांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या ठिकाणी आंबेडकर वाडीतील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेमुळे रंगपंचमीला नाशिक शहरात गालबोट लागले असून रंगाचा भंग झाला अशी चर्चा सुरू झाली आहे.
यातील हल्लेखोरांचा सुगावा पोलिसांनी काही तासात लावला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.