Nashik : अशोका मार्ग येथे भरदिवसा घरफोडी; 22 तोळ्यांचे दागिने लंपास
Nashik : अशोका मार्ग येथे भरदिवसा घरफोडी; 22 तोळ्यांचे दागिने लंपास
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक व लॅच लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून 22 तोळ्यांच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे 6 लाख 12 हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना अशोका मार्ग येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी डॉ. मृणाल शैलेश काळे (रा. अशोका टॉवरच्या समोर, अशोका मार्ग, नाशिक) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्याने तोडून घराचा सेफ्टी दरवाजा व लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटात असलेल्या 1 लाख 11 हजार रुपये किमतीच्या 60 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, 21 हजार 816 रुपये किमतीच्या 24 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 71 हजार 211 रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची एक बांगडी, 1 लाख 46 हजार 960 रुपये किमतीच्या 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 11 हजार 250 रुपये किमतीचा 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 96 हजार 602 रुपये किमतीचे 24 ग्रॅम वजनाचे लांब सोन्याचे मंगळसूत्र, 67 हजार 248 रुपये किमतीचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 4 हजार 500 रुपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, 2 हजार 250 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, 8 हजार 564 रुपये किमतीच्या 2.50 ग्रॅम वजनाच्या कानातील कुड्या, 918 रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 1 हजार 700 रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन कुड्या, 40 हजार 16 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची छोटी चेन, 118 रुपये किमतीचा 15 ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला, 18 हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा व 10 हजार रुपये रोख असा एकूण 6 लाख 12 हजार 153 रुपये किमतीचा ऐवज भरदिवसा घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group