नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा विनोद शहा यांच्या खेळाडू पॅनलने बाजी मारत सर्वच्या सर्व जागांवर विजयाची नोंद केली.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समीर रकटे यांनी सेक्रेटरी पदासाठी तसेच योगेश हिरे यांनी सह सेक्रेटरी चंद्रशेखर दंदणे यांनी सह सेक्रेटरी पदासाठी भरला होता. यामध्ये त्यांनी बिनविरोध विजय प्राप्त केला. त्याचबरोबर निवड समितीसाठी तरुण गुप्ता, सतीश गायकवाड, फैयाज गंजीफ्रॉकवाला हे देखील बिनविरोध निवडून आले.
आज मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विनोद शहा यांना 1243 तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेश झुंजार आव्हाड यांना अवघी 68 मते पडली.
कार्यकारणी सदस्यांमध्ये महिंद्रा आहेर यांना 1222, डॉ. भंडारकर 1233, बाळासाहेब मंडलिक 1205, विक्रांत मते 1255, नितीन धात्रक 1224, रघवेंद्र जोशी 1211, हेतल पटेल 1169, जगन्नाथ पिंपळे 1103, निखिल टिपरी 1197, शिवाजी उगले 1064 मते मिळवत विजय संपादन केला.
दुसरीकडे महेश भामरे 198, संदीप सेनभक्त 562, सिसोदिया 152 मते पडली.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीची निवडणूक विद्यमान चेअरमन धनपाल (विनोद) शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळाडू पॅनलचे एकूण सात पदाधिकारी - १ सेक्रेटरी, १ खजिनदार, २ जॉइंट सेक्रेटरी व ३ निवड समिती सदस्य असे याधीच बिनविरोध निवडून आले. चेअरमनपदा करिता दोन - खेळाडू पॅनल व वैयक्तिक उमेदवार व कार्यकारिणी सदस्य १० पदांसाठी - खेळाडू पॅनलचे १० व वैयक्तिक ३ असे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते.
मतदान अन्नपूर्णा सभागृह, नंदनवन लॉन्स, मते नर्सरी, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे झाले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे एकूण ३११२ आजीव सभासद व संलग्न एकूण ७६ क्लब सभासद आहेत.
ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्स यांनी यंदाची निवडणूक मतदान यंत्राद्वारे घेतली. यावेळी ॲड. चैतन्य शाह यांचे सहकार्य लाभले. यावेळी ॲड. विलास लोणारी, विनोद यादव, मंगेश शिरसाट, भावना गवळी, शर्मिला साळी, रतन कुयटे, शांताराम मेणे उपस्थित होते.