आनंदाची बातमी ! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर
आनंदाची बातमी ! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर
img
दैनिक भ्रमर
भाविकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिकचे त्र्यंबकेश्वर  हे देवस्थान सुप्रसिद्ध असून राज्यभरातून  निरनिराळ्या ठिकाणांहून भाविक येत असतात. आता याच भाविकांसाठी आणि नाशिकरांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नाशिकमध्ये यंदाचा सिंहस्थ कंभुमेळा होत असून तत्पूर्वीच नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी समोरा आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे, येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना देखील मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. आता, त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र 'अ' दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ, महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आशा वेगवेगळ्या कारणाने वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे, तिर्थक्षेत्र अ दर्जा देण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा भाविकांना व मंदिर प्रशासनाला फायदा होणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group