पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध समजल्यावर पतीने घेतला भलताच निर्णय !  पतीला निळ्या ड्रमची भीती ?
पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध समजल्यावर पतीने घेतला भलताच निर्णय ! पतीला निळ्या ड्रमची भीती ?
img
नंदिनी मोरे
आजकाल विवाहबाह्य संबंधातून अनेक धक्कादायक आणि गंभीर असे गुन्हे घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान आता एक आश्चर्यचकित करणारी एक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध उघकीस आल्यावर एक भलताच निर्णय घेतला आहे.  एका पतीला त्याच्या पत्नीचे  पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर जे काही घडलं ते वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पतीला कळलं, त्यानंत महिलेचा पती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे त्याने पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यानंतर पतीने असं काही केलं जे पाहून पोलिसही थक्क झाले. पतीने त्याची तीन मुलं आणि त्याच्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराकडे सोपवला. 

बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगढ परिसरातील फतेहगढ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत कळलं. पत्नीचे प्रेमसंबंध तिच्या पुतण्यासोबत सुरु असल्याने पतीलाही मोठा धक्का बसला. महिलेच्या प्रियकराचं घर तिच्या घराच्या शेजारीच होतं. महिला आणि तिच्या पतीला तीन मुलं आहेत. एक दिवस पतीने त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला विचित्र अवस्थेत पाहिलं.

त्यानंतर पती आणि पत्नी दोघंही घाबरले. पण पतीने कोणत्याच प्रकारचा वाद केला नाही. पती पोलीस ठाण्यात पोहोचला आणि तिथे पत्नीला आणि तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यानंतर पतीने पत्नीसोबतचे सर्व संबंध तोडले आणि पत्नीला प्रियकरासोबत राहायला सांगितलं. इतकच नव्हे तर पतीने या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. दरम्यान , कुटुंबियांनी संपूर्ण घटनेबाबत मोठा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पत्नी नेहमीच पतीला जीवे मारण्याची धमकी द्यायची. ती म्हणायची, मेरठच्या मुस्कानसारखं प्रकरण करून पतीला मारून टाकेन आणि निळ्या ड्रममध्ये भरेल. पत्नीच्या या धमक्यांमुळे पती खूप घाबरला होता आणि त्याला धक्का बसला.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group