राजकीय ! भाजपचा ''हा'' माजी मंत्री करणार शिवसेनेत प्रवेश
राजकीय ! भाजपचा ''हा'' माजी मंत्री करणार शिवसेनेत प्रवेश
img
नंदिनी मोरे
राज्यात स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा राजकीयता वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. दरम्यान आता भाजपाचे  माजी मंत्री जगदीश गुप्ता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे. लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत गुप्ता यांनी स्वत: बंडखोर उमेदवार म्हणून आपली घोषणा केली होती. पण या निवडणुकीमध्ये गुप्ता यांना पराभवाचा सामना करावा लागला. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर गुप्ता यांनी भाजपमध्ये परत येण्याची हालचाल केली पण पक्षाकडून कोणतेच संकेत दिले नाही. त्यामुळे अखेरीस गुप्ता यांनी शिवसेनेची वाट निवडली आहे.

आताा लवकरच त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे, जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार आणि एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते.आता अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार असल्याचं बोललं जात आहे. जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे तर भाजपचे या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा आणि भाजपमध्ये गुप्ता यांना मानणारा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group