राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार धडाका सुरु आहे. दरम्यान, या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचंच जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुण्यात दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.

पुण्यात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला आहे. कर्वेनगर येथील अलंकार पोलिस चौकीजवळ तरुणाच्या अंगावर झाड पडलं. राहुल जोशी असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.अंगावर झाड पडल्याने राहुल जोशी हा तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र दवाखान्यात उपचारांसाठी गेल्यावर मृत घोषित करण्यात आले.
मयत राहुल जोशी हे सिंहगड रोड परिसरात जायला निघाला असताना त्याच्या अंगावर झाड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल जोशी यांच्या अंगावर कोसळलेलं झाड हे कुजलेल्या अवस्थेत होतं.त्यामुळे जे झाडं कोसळण्याच्या अवस्थेत आहेत ते झाड पावसाळ्यापूर्वीच काढण्याचं काम महापालिकेने करायला हवं होतं, कोसळू शकतात अशा फांद्यांची छाटणी देखील करायला हवी होती. मात्र महापालिकेने पावसाळ्यापूर्वी करायची कामे न केल्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. महापालिकेच्या या निष्काळजीपणाविरोधात स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.