बांगलादेशमध्ये अलिकडे राजकीय बदल झाल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पायउतार झाल्यानंतर आणि मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.दरम्यान आता भारताने शनिवारपासून (17 मे) बांगलादेशमधून येणाऱ्या काही वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मासे, तेल आणि दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकनाच वाहतूक परवानगी देण्यात आलेली आहे. निर्बंध लावल्यानंतर भारत – बांग्लादेशच्या सीमेवर रांगा लागल्या आहेत. यामुळे बांग्लादेशला 66 हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. बांग्लादेशने ऑपरेशन सिंदूर नंतर घेतलेल्या भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
निर्बंध घातलेल्या वस्तूंमध्ये रेडीमेड कपड्यांव्यतिरिक्त प्लास्टिक आणि पीव्हीसी उत्पादनं, लाकडी फर्निचर, फळांची आणि कार्बोनेटेड पेये, बेकरी, कापसाशी संबंधित टाकाऊ वस्तू आणि मिठाई उत्पादनं यांचा समावेश आहे. हे सर्व आता मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि पश्चिम बंगालमधील अकरा नियुक्त सीमा चौक्यांमधून भारतात प्रवेश करू शकणार नाहीत.