हृदयद्रावक ! अंगावर स्लॅब कोसळून तरुणीचा मृत्यू
हृदयद्रावक ! अंगावर स्लॅब कोसळून तरुणीचा मृत्यू
img
नंदिनी मोरे
गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे तर  काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहे. दरम्यान, आता अहिल्यानगर मधून एक अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची अवस्था दयनीय झाली आहे. विशेषतः जुन्या आणि कमकुवत घरांवर मोठा धोका निर्माण झाला आहे.


अहिल्यानगरमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच पावसामुळे जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. एका तरुणाच्या अंगावर स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्लॅबचं ढिगार बाजूला करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील संदीप नगर, सारसनगर परिसरात पावसाची सततधार सुरू आहे. अशातच मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास  सारसनगर इथं एका घराच्या बाहेर असलेला स्लॅब कोसळला.  या दुर्घटनेमध्ये तनवी केदार रासने (वय २०) हिच्या घराचा स्लॅब कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पाऊस सुरू होता, त्यामुळे तनवी रासने ही घराच्या समोर उभी होती. पण अचानक घराचा स्लॅब कोसळला. स्लॅबच्या ढिगाराखाली तनवी सापडली. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत्यू घोषित केलं.  तनवीच्या मृत्यूमुळे रासने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group