वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केला असलायचा आरोप आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, तिचा सासरा आणि सासू तसेच नणंद यांना अटक केली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहेदरम्यान नवनवीन खुलासे होत असून आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती. तर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना देखील अटक केली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच राजेंद्र हगवणे याने पळून जाण्यासाठी जे वाहन वापरले होते, ते देखील पोलिसांनी जप्त केलं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आज वैष्णवीचे दोन्ही भाऊ विराज आणि पृथ्वीराज तसेच तिची एक मैत्रीण अशा एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेले चांदीची भांडी देखील जप्त केली आहेत. त्यामध्ये पाच ताटं ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा आणि अधिक महिन्यात देण्यात आलेल्या एका चांदीच्या ताटाचा समावेश आहे.