पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत?  प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना  सवाल
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना सवाल
img
नंदिनी मोरे
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर भारत पाकिस्तान तणाव प्रचंड वाढला, त्यानंतर अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली.


दरम्यान, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. ‘ मोदीजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की प्रचारमध्ये?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

‘दरम्यान अजून त्या महिलांना न्याय मिळालेला नाही, ज्यांच्या पतींची पहलगाम हल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली, एक महिना झाला, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? आणि तुम्ही उत्सव साजरा करत आहात?’ असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group