भारत पाक तणाव  ! पुणे प्रशासनाने घेतला ''हा'' मोठा निर्णय, आता ''या' गोष्टीवर  बंदी
भारत पाक तणाव ! पुणे प्रशासनाने घेतला ''हा'' मोठा निर्णय, आता ''या' गोष्टीवर बंदी
img
नंदिनी मोरे
 
पहलगाम हल्ल्यानंतर दशतवाडी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले यानंतर हा तणाव अधिकाचं वाढला परंतु दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला आहे. दरम्यान तरीही  

भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील पोलीस अलर्टवर आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरानंतर आता पुणे ग्रामीण परिसरात देखील ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे.

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावानंतर महत्वाच्या स्थळांना दहशतवादी कडून लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे पुणे शहरानंतर आता पुणे ग्रामीण परिसरात देखील ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर पुणे शहरात कुठल्याही कारणास्तव ड्रोन उडवण्यास सक्त बंदी केल्यानंतर आता पुणे ग्रामीण भागात देखील बंदी घेतली आहे.

ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रोलाईट एयरक्राफ्ट, पॅराग्लाइडर, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एयर फुगे आणि इतर सर्व हवेत उडाण करणारे यावर सक्तीची बंदी पुणे ग्रामीण परिसरात घालण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी माहिती जाहीर करत सांगितले की, जे कोण नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर सक्त करवाई करण्यात येईल. कोण नियम उल्लंघन करताना आढल्यास 020- 25657171 या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर कळवावे असेही सांगण्यात आले आहे

धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे, सागरी हद्द या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने आवश्यकत्या उपाय योजना करणे, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. दहशतवाद्यांकडून देशातील महत्वाच्या स्थळांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group