आजकाल अनेक धक्कादायक आणि विश्वास न ठेवता येणाऱ्या घटना आज काल समोर येत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं अतिशय निर्मळ असं नातं असत. सध्या अशाच एका शिक्षिकेने केलेला गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेने अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचे शोषण करण्याचा प्रयत्न केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार , हा प्रकार रशियातील एका शाळेत घडला आहे. या शिक्षिकेचे नाव अन्ना फ्लास्क्यूक असे असून ती 27 वर्षांची आहे. द न्यूयॉर्क पोस्टने याबाबत विस्तर वृत्त दिलं आहे. तिचे सगळे विद्यार्थी तिला चांगली आणि होतकरू शिक्षिका समजायचे. मात्र तिचा हा कारनामा समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
या शिक्षिकेने 11 वर्षीय विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील कागदपत्रांनुसार तिने विद्यार्थ्याला तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावण्यास प्रवृत्त केले. तसेच विद्यार्थ्याला तिचे नग्न फोटोदेखील दाखवले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला शिक्षिकेने चुंबन घेण्यासही भाग पाडले आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोप शिक्षिकेने कबूल केले आहेत.
विद्यार्थ्याने अगोदर या शिक्षिकेची प्रशंसा केली होती. त्यानंतर मी त्याच्याकडे आकर्षित झाले, असा दावा या शिक्षिकेने केला आहे. या शिक्षिकेला आता 9 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती विद्यार्थ्याच्या नको तिथे हातही लावायची असा आरोप करण्यात आला होता.
संबंधित शिक्षिकेने पीडिता विद्यार्थ्याला तिचे नग्न फोटो पाठवले होते. त्यानंतर त्या विद्यार्थ्यालाही तुझे असेच फोटो पाठव, अशी मागणी केली. मात्र पीडित मुलाच्या आईने मोबाईल पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. अश्लिल मेसेजस आणि फोटो पाहून त्या आईला धक्काच बसला.
हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलाच्या आईने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर अन्ना शिक्षिकेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तिला एकूण 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच तिच्यावर शिक्षा संपल्यानंतर 1 वर्षासाठी शिकवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.