संपूर्ण शाळेत दहावीची एकच विद्यार्थीनी अन शिकवायला 7 शिक्षक,  नेमका  निकाल काय लागला ?
संपूर्ण शाळेत दहावीची एकच विद्यार्थीनी अन शिकवायला 7 शिक्षक, नेमका निकाल काय लागला ?
img
नंदिनी मोरे
आज  दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय.  आजचा निकाल काही विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा ठरला तर काहींना मात्र निराशाच मिळाली. दरम्यान, आजच्या दहावीच्या निकालाची सर्वत्र चर्चा असताना आता एक माहिती समोर आली आहे. 
मध्य प्रदेशमधील दहावीच्या एका निकालाची चर्चा सध्या होतेय. 
 
लखनपुरा हायस्कूल मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शाळा सध्या चर्चेच कारण बनलीय. कारण या शाळेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण शाळेत फक्त 34 विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी 7 शिक्षक आहेत. या 7 शिक्षकांपैकी 3 गेस्ट टिचर आहेत. या शाळेत दहावीत फक्त एकच मुलगी होती. तिला 7 शिक्षक शिकवत होते.

7 शिक्षकांनी दहावीची तयारी करुन घेतल्यानंतरही ती विद्यार्थीनी नापास झाली. दहावीच्या एका विद्यार्थ्यीनीला प्रत्येक विषयात थेअरीत फक्त 4 ते 7 गुण मिळाले. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीला 500 पैकी फक्त 133 गुण मिळाले आणि ती नापास झाली. म्हणजे या शाळेतील संपूर्ण दहावीचा वर्ग नापास झाला. कारण ती संपूर्ण वर्गात एकटीच मुलगी होती. यावरून या शाळेची काय अवस्था आहे याचा अंदाज येऊ शकतो. गुना येथील खजुरी शाळेतही अशीच परिस्थिती होती. इथेही दोन्ही विद्यार्थी परीक्षेत नापास झाले.

                                                                                           
इतर बातम्या
Join Whatsapp Group