भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या ‘त्या’ भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश
भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या ‘त्या’ भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश
img
दैनिक भ्रमर
पहलगाम येथील दहशतवादी  हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत -पाकिस्तानचे युद्धाचे ढग पुन्हा घोंगावू लागलेअसून आता या पार्शवभूमीवर भारत हाय अलर्ट मोड यावर आला असून आवश्यक ती खबरदारी घेतली जातेय. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.  

भारतातील विविध महत्वाच्या, संवेदनशील भागात अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थाही चोख तैनात करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या किनारपट्टी भागाच्या सुरक्षेत तसेच गस्तीत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अरबी समुद्र किनारपट्टी वरतीही अलर्ट जारी केला आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रात करडी नजर ठेवण्यात येत आहे.

 समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच ऑफशोअर डिफेन्स एरियामध्ये मच्छिमारांना मासेमारी करता येणार नसून त्या क्षेत्रात बोट आढळल्यास थेट शूट-टू-किलचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

 सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खालील सूचनांचा समावेश आहे –

१) भारतीय नौसेनेकडून समुद्रात ODA (ऑफशोअर डिफेन्स एरिया) या क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही… ह्या क्षेत्राल बोटी आढळ्यास शूट-टू-किल चे आदेश देण्यात आले आहेत. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या क्षेत्राचा आश्रय घेऊ नये.

२) मत्स्यवयसाय विभागातील LO ह्यांना सहकार्य करावे, कारण देशाची सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमारांवर सुद्धा असल्याने या कठीण परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनांना सहकार्य करावे, ही विनंती.

तसेच खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या बोटींनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीच्या लँडिंग पॉईंट वरती विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अरबी समुद्रातील बारीक-सारीक हालचालींवर तटरक्षक दलाचं बारीक लक्ष आहे. एवढंच नव्हे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात यंत्रणा अलर्टवर आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group