मुलगा आणि वडिलांच्या नात्यात कधी कधी कडवाहट ही येत असते वडील अनेकदा आपल्या मुलाला काही गोष्टींसाठी रोकटोक करत असतात पण एका पिता पुत्राचा दारूमुळे झालेला वाद विकोपाला गेला आणि त्यातून एक अनर्थ घडला असल्याची घटना घडली आहे. दारुमुळे वडील आणि मुलामध्ये चक्क भांडणं झाली आहेत. याच भांडणात बापाने आपल्याच लेकाने खून केला असल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू मुलाने पिल्यामुळे वडिलांना राग अनावर झाला आहे. याच रागातून पित्याने आपल्याच पोटच्या मुलाचा खून केला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना समोर आल्यानंतर आरोपी वृद्ध पिता हिरामण धुर्वेला पोलिसांनी केली अटक केली आहे. मृत मुलगा आणि आरोपी वडील हे दोघेही दारुच्या आहारी गेले होते. आरोपी वडिलाने घरी दारू आणून ठेवली होती. पण वडिलांऐवजी त्यांच्या मुलानेच ही दारु पिली. त्यानंतर मुलगा झोपी गेला.
नंतर मात्र बाप आणि लेक या दोघांत भांडणं चालू झाली. हे भांडण नंतर वाढत गेले. दोघांत हाणामारी झाली. यातच झोपेत असलेल्या 32 वर्षीय मुलावर केले पित्याने काठीने वार केले आणि या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.