आयपीएल 2025 : ''या'' माजी क्रिकेटपटूची विराटवर टीका
आयपीएल 2025 : ''या'' माजी क्रिकेटपटूची विराटवर टीका
img
नंदिनी मोरे
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामना सुरु आहे. आयपीएलच्या फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चँलेंजर्स बंगळूरूने 190 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे पंजाबला किंग्जला आता ट्रॉफी जिंकण्यासाठी 191 धावा कराव्या लागणार आहेत. पण या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. दरम्यान, ओमरझाने शॉर्ट बॉलवर त्याची विकेट काढली. कोहलीने 35 बॉलमध्ये 43 धावा केल्या दरम्यान,  यावरून आता  भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाणने विराट कोहलीवर सडकून टिका केली आहे. 

खरं तर पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे रॉयल चँलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजीस उतरली होती. यावेळी बंगळुरूची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण एकामागून एक विकेट पडत होते. यावेळी कोहली एकाबाजूने बंगळुरूचा डाव सावरून होता.

दरम्यान, कोहली मैदानावर टीकून खेळत होता मात्र त्याच्या फलंदाजीत हवी तितकी आक्रमकता नव्हती, आणि ज्यावेळेस कोहलीने आक्रमकपणे खेळायला सुरूवात केली.त्यावेळी ओमरझाने शॉर्ट बॉलवर त्याची विकेट काढली. कोहलीने 35 बॉलमध्ये 43 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने फक्त 3 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 122.86 होता.

हाच स्ट्राईक रेट पकडून आता इरफान पठाणने कोहलीवर टीका केली आहे. पंजाब किंग्जचे बॉलर विराट कोहलीला शॉर्ट आणि स्लो बॉल टाकत राहिले. या खेळपट्टीवर 35 चेंडूंनंतर 123 चा स्ट्राईक रेट निराशाजनक आहे,अशा शब्दात पठाणने कोहलीवर निशाणा साधला आहे. इरफानच्या या टीकेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group