ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, आदित्य ठाकरेंनी केलं ''हे'' मोठं वक्तव्य
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, आदित्य ठाकरेंनी केलं ''हे'' मोठं वक्तव्य
img
नंदिनी मोरे
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह अनेक छोट्या पक्षांना देखील पराभवाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला देखील मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. 

राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरु झाली.आता युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणार असेल तर स्वागत, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.दरम्यान, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी अनुकूल असल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना हीच आहे की,मराठी माणसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी सोबत येण्यास तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊव लढण्यास तयार आहे.डोंबिवलीत तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलन केले आहे. आमचं मन साफ आहे. महाराष्ट्र हितासाठी जो कोणी पक्ष आमच्यासोबत येण्यासाठी तयार असेल तर आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढू...

कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group