वाघाच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मुल तालुक्यातील महादवाडी येथे तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला बुधा दोंडे वय (अंदाजे 50) या महिलेवर वाघाने हल्ला केला आहे.
तेंदुपत्ता तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर झुडपात दबा धरून बसलेल्या एका वाघानं थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.यावेळा वाघानं महिलेला गळ्याला धरून दूरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेमुळे चंद्रपुरारात दोन दिवसात वाघाने केलेला हा चौथा हल्ला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुल तालुक्यातील महादवाडी येथे तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला बुधा दोंडे वय (अंदाजे 50) या महिलेवर वाघाने हल्ला केला आहे. विमला दोंडे या गावातील इतर महिलांसोबत सकाळी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. महादवाडी पिंपळखुट जंगलामध्ये मध्ये या महिलांवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात विमलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक महिला, पुरुष आणि लहान मुले सकाळीच जंगलात जातात. याच दरम्यान उन्हामुळे पाण्याच्या शोधात असलेले वाघ जंगलात फिरत असतात. मानवी वाघ संघर्ष टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.