ओझर विमानतळाने एप्रिलमध्ये गाठला विक्रमी टप्पा ! ''इतक्या'' हजार प्रवाशांची नोंद
ओझर विमानतळाने एप्रिलमध्ये गाठला विक्रमी टप्पा ! ''इतक्या'' हजार प्रवाशांची नोंद
img
दैनिक भ्रमर
नाशिकच्या ओझर विमानतळाने एप्रिलमध्ये प्रवाशांच्या संख्येचा  विक्रमी टप्पा गाठला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली आहे.  ओझर विमानतळावरून एप्रिल २०२५ मध्ये विक्रमी ३६,०८१ प्रवाश्यांनी हवाई प्रवास केला आहे. ओझर विमानतळ सुरु झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक झाल्याचे नोंदले गेले आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात ओझर विमानतळावरून एकूण २,४२,३७२ प्रवासी प्रवास करत होते. मात्र २०२४-२५ मध्ये ही संख्या ३,४१,११२ वर पोहोचली, म्हणजेच ४०.७ टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे एप्रिल २०२५ मध्येच १७,८१० प्रवासी नाशिकमध्ये उतरले, तर १८,२७१ प्रवाश्यांनी येथेून उड्डाण केले. मार्च २०२५ मध्ये ३४,३४९ प्रवाशांनी प्रवास केला होता, तर एप्रिलमध्ये हा आकडा वाढून ३६,०८१ झाला 

२०१७ मध्ये प्रवासी सेवेसाठी खुले झालेल्या ओझर विमानतळाला केंद्र सरकारच्या ’उडान’ (UDAN) योजनेअंतर्गत गती मिळाली. सध्या इंडिगो एअरलाईन्सकडून अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि गोवा या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. हॉपिंग फ्लाइट्सची सुविधा मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group