आजकाल प्रेमाचे नाटक करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेऊन नंतर त्यांना धोका दिल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्टेल शिपायाकडून तरुणीला लग्नाचं वचन देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवर महिला पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही शिपायाला अटक झालेली नाही. यामुळे पीडित तरुणी त्रस्त आहे.
तरुणीने पोलिसांना सांगितले की, ती मूळची बाराबंकीची रहिवासी आहे. सध्या ती राम जन्मभूमी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेढी बाजारात राहते. डिसेंबर 2021 मध्ये टेढी बाजारातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आणि रामललाचे दर्शन घेण्यासाठी ती आली होती. तेव्हा ती आपल्या मैत्रिणीसोबत तिच्या खोलीत एक महिना राहिली. वाचा: पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, संतापलेल्या पतीने… सत्य समोर येताच बसला धक्का
या काळात हॉस्टेलमध्ये शिपाई रितेश तिवारी याच्याशी भेट झाली. हळूहळू त्यांच्यात बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये जवळीक वाढली. शिपायाने लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावर पीडितेने लग्नापूर्वी काहीही करण्यास नकार दिला.मात्र, शिपायाने तरुणीचे ऐकले नाही आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर 2022 पासून लग्नाचे आमिष दाखवून तो शारीरिक संबंध बनवत राहिला. पीडितेने वारंवार लग्नासाठी आग्रह केल्यावर त्याने लग्नास नकार दिला. त्रस्त होऊन पीडितेने गुन्हा दाखल केला.
महिला पोलीस ठाण्यात 3 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत आरोपीची अटक झालेली नाही. त्यानंतर पीडितेने 6 मे रोजी अटकेसाठी आयजी कार्यालयाला अर्ज दिला. तिथूनही निराशा हाती लागली. आरोपी शिपायी मूळचा कानपूरचा रहिवासी आहे आणि सध्या तो फरार असल्याचे सांगितले जात आहे. आज पुन्हा एकदा पीडितेने पोलिसांना आरोपीला अटक करण्याची विनंती केली आहे.