आजकाल अनैतिक संबंधातून अनेक धक्कादायक घटना घडत असून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकांचे विवाहबाह्य संबंधातून आयुष्य खराब झाले आहे. आता अशीच एक वाहिनी आणि दिराची कहाणी समोर आली आहे. वाहिनी आणि दिराच्या या आई-मुला सारख्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून समोर आलाय आहार.
येथे एका महिलेला तिच्या दिराच्या प्रेमात पडली. दोघांची जवळीक वाढली आणि त्यांचे 4 वर्षे अनैतिक संबंधात होते. पण एके दिवशी जेव्हा नवऱ्याला त्यांच्या संबंधांबद्दल कळले, तेव्हा त्याने सगळे संबंध तोडले. मग ती महिला तिच्या दिराकडे गेली. पण तिथेही तिचा भ्रमनिरास झाला. आता ती महिला रडत-रडत पोलिसांना आपली तक्रार देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , हा सौरिख पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील प्रकार आहे. येथे एक महिला न्यायासाठी याचना करत आहे. ती म्हणत आहे की साहेब! माझे लग्न 20 वर्षांपूर्वी झाले होते. मला 2 मुलेही आहेत. माझे पती दुसऱ्या शहरात काम करतात, त्यामुळे ते क्वचितच घरी येत होते. माझ्या पतीच्या गैरहजेरीत माझा दीर माझ्यावर वाईट नजर ठेवत असे. सुरुवातीला मला माझ्या दिराच्या या सगळ्या गोष्टी आवडल्या नाहीत, पण नंतर मलाही तो आवडायला लागला. मग आमच्यात जवळीक वाढली आणि आमचे शारीरिक संबंध निर्माण झाले.
ती पुढे म्हणाली की, दीर नेहमी मला सांगायचा की, तो माझ्याशी लग्न करेल. मीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. असे 4 वर्षे निघून गेले. दीर रात्री अनेकदा माझ्या घरी येत असे, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण एके दिवशी माझ्या पतीला आमच्या संबंधांबद्दल कळले. त्याने माझ्याशी सगळे संबंध तोडले आणि मला सोडून तो निघून गेला.
यानंतर जेव्हा महिलेने तिच्या दिराला लग्न करण्यास सांगितले, तेव्हा तो टाळाटाळ करत राहिला. पण नंतर त्याने स्पष्टपणे तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आता ती महिला रडत आहे आणि म्हणत आहे की, तिला आता कुठे जायचे हे समजत नाही. तिचा नवराही नाही आणि तिचा दिरही तिला ठेवायला तयार नाही. ती एकटी पडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून एसपींनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.