पहलगाम येथील दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटने नंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. याआधी भारताने सिंधु पाणी करार स्थगितीचा निर्णय घेऊन पाकिस्तानला चांगलाच मोठा धक्का दिला आहे. भारताकडून पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत.
दरम्यान, आता पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बगलिहार धरणातून भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले आहे. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलेला आहे. पाकिस्तानसोबत व्यापार बंदी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भारताकडून पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. याआधी देखील सिंधु पाणी करार स्थगितीचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद करण्याचाही कठोर निर्णय भारत सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.