सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर माजी मंत्री आणि आमदार धंनजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान आता अशीच एक बातमी समोर येत आहे.
धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करूणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही धमक्या आणि छळ सुरूच आहे. कोर्टात अर्ज केल्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत धनंजय मुंडे मला धमक्या देत असून धनंजय मुंडेंनी मला फोन करत १८ तुकडे करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. लव्ह जिहाद पेक्षा माझ्यावर जास्त अन्याय होत असून मागणी करूनही पोलीस सरंक्षण दिलं नसल्याचा दावा करूणा शर्मा यांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे .
करूणा शर्मा म्हणाल्या, स्वत: धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात अजूनही हिंसा सुरुच आहे, यासंदर्भात तक्रार कोर्टात दिली आहे. याबाबत व्हाॅट्सॲप चॅट, एनसी देखील पुरावे देखील कोर्टात दिले आहेत, पोलिस तक्रार दाखल करतात. मात्र काही करत नाही. दबावतंत्र धमकी देण्याचे काम करत आहे, बहिणीवर बोलत आहे, म्हणून मला धनंजयने धमकी दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंनी स्वत: फोन करत मला धमकी दिली आहे. मला म्हणाले तू जास्त तोंड उघडत आहे आता, माझ्या बहिणीवरपण बोलायला लागली... आता तुझी बहीण आणि तू किती पाण्यात आहे हे मी ५० टक्के तोंड उघडले आहे, ज्यादिवशी माझ्या डोक्यावरून पाणी जाईल तर मी तोंड उघडणार आहे, असे करूणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करूणा मुंडे यांनी वांद्रे दंडाधिकारी कोर्टात नव्यानं अर्ज केला आहे. धमक्यांसोबत आपल्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले अश्लील व्हिडिओही पाठवले जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ज्या व्हीडिओ आणि फोटोत आपण नाही, तरीही त्यात आपणं असल्याचं दाखवून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे.