लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शरीरसंबंध, अन लग्न तिच्या मत्रिणीशी केले
लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शरीरसंबंध, अन लग्न तिच्या मत्रिणीशी केले
img
दैनिक भ्रमर
आजकल प्रेमात फसवणूकीच्या अनेक घटना घडत आहेत. लग्नाचे आमिष  दाखवून मुलींशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीला लग्नच आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले अन नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केल्याची घटना घडली आहे. 

नोकरीच्या निमित्ताने सध्या पुण्यात राहाणारा ओंकार उत्तम प्रधान (वय २२, मूळ रा. कारंडेवाडी, ता. करवीर) याने लग्नाचे आमिष दाखवून, प्रेमाच्या आणाभाका घेत एका मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवले. मात्र, काही दिवसांत तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने कोडोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्याने ओंकारची वरात थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. १२ वी पर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारने पुण्यातील कंपनीत काम करतो. 

इन्स्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिला संसाराची स्वप्ने दाखवली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. दरम्यानच्या काळात त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जुळवले व आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्नही केले.हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group