नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जेलरोड येथील बालाजी नगर,मोरे मळा परिसरात दोन तडीपार असलेल्या युवकात हाणामारी झाल्याने एकाची हत्या झाली तर त्याच्यासोबत आलेल्या युवक जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली. हल्लेखोर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन "सरेंडर" झाला.
नाशिकरोड परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कोयते,तलवारी,गावठी कट्टे यांचा सरस वापर परिसरात होताना दिसतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्याबद्दल टीका होऊ लागले आहे. त्यातच काल झालेल्या नाशिकरोड परिसरातून तडीपार असलेल्या दोघा युवकांमध्ये हाणामारी झाली.
मोरे मळा बालाजी नगर येथील निलेश पेखळे व जेलरोड महाजन हॉस्पिटल मागे राहणाऱ्या हितेश डोईफोडे या दोघा युवकांना पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की हितेश डोईफोडे व निलेश पेखळे हे दोघे मित्र आहे. निलेश पेखळे याला भेटण्यासाठी हितेश त्याचा मित्र बंटी बांग याला घेऊन मोरे मळा, बालाजी नगर येथे गेले. त्यानंतर हितेश व निलेश मध्ये काही कारणामुळे वाद निर्माण झाले, झटापटी व त्यानंतर हाणामारी झाली. यावेळी निलेश याने धारदार शस्त्र व लोखंडी रॉड हितेशच्या डोक्यात प्रहार केला व बंटी याला मारहाण केली. जखमी बंटी यांनी त्याच्या भावाला फोन करून बोलून घेतले व बिटको रुग्णालयात उपचारर्थ दाखल झाला. जखमी अवस्थेत हितेश याला निलेश याने आपल्या चारचाकी गाडीतून जिल्हा रुग्णालयात घेऊन गेला. तेथे निलेशच्या लक्षात आले की हितेश मृत झाला, त्याने हितेश ला स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटल मधून पळ काढला व थेट नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले.गुन्ह्याची कबुली दिली. वैद्यकीय अधिकारी यांनी हितेश डोईफोडे याला तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती समजतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.