मालेगाव : मालेगाव शहरामध्ये बोगस जन्मदाखले प्रकरणामध्ये ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी केली असून याबाबत चौकशी सुरू आहे. यामुळे मालेगाव सह जिल्ह्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तर मायनॉरिटी सेल विभागाने या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे.
मागील काही दिवसापासून सातत्याने मालेगाव शहर विविध प्रकरणांमध्ये गाजत आहे. भाजपाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंगे राहत असल्यासंदर्भामध्ये आवाज उठवला होता. त्या संदर्भात चौकशी सुरूच आहे तर किरीट सोमय्या यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेटच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण झाल्याची घटना समोर आणली होती. तर बांगलादेशी रोहिंगटे प्रकरणांमध्ये मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
त्या गुन्ह्याचा तपास देखील सुरू आहे तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना केली होती आणि हे तपास पथकाचे अधिकारी अजूनही मालेगावमध्ये तपास करत आहे. या सर्व घटना घडत असतानाच मालेगाव मध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास ईडीने छापा मारी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव मध्ये मागील काही दिवसापासून नगरपालिका आणि इतर प्रशासकीय विभागाकडून देण्यात आलेल्या बोगस जन्म दाखल्या प्रकरणांमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरामध्ये दाखल झालेल्या ईडीच्या पथकाने नऊ ठिकाणी छापेमारी केली असून या ठिकाणी ईडीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून घराची झडती घेतली जात आहे. त्यांच्या मदतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून अधिक तपास ईडीचे अधिकारी करीत आहेत.
ही तर मालेगावची बदनामी : आसिफ शेख
या सर्व प्रकरणावर बोलताना मायरनॉरिटी कमिटीचे प्रमुख सदस्य असलेले माजी आमदार असिफ शेख यांनी सांगितले की, मालेगावला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे अधिकारी पाठवण्याचे काम केलं जात आहे. मालेगाव मध्ये बांगलादेशी रोहिंग्टन संदर्भामध्ये केलेले आरोप हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता ते पाप झाकण्यासाठी म्हणून सरकारकडून अशा वेगवेगळ्या तपास कमिट्या पाठविल्या जात आहेत. या सर्वांच्या विरोधात आम्ही लढण्यास तयार आहोत. सरकारला आम्ही सहकार्य करू पण मालेगावची बदनामी देखील सहन करणार नाही, असे ते म्हणाले