संतापजनक !  २ अल्पवयीन मुलींवर  दोन जणांकडून अत्याचार,  नागरिकांकडून पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक
संतापजनक ! २ अल्पवयीन मुलींवर दोन जणांकडून अत्याचार, नागरिकांकडून पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक
img
दैनिक भ्रमर
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून हल्ली अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमधून आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या चिमूर येथे २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला. अत्याचार केल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याबाहेर घेराव घालत अत्याचाराबाबत आवाज उठवला. त्यामुळे परिसरात तीव्र तणाव निर्माण झाले होते. नराधमांना तातडीने ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर धडक दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चिमूरमध्ये २ अल्पवयीन मुलींवर २ नराधमांनी अत्याचार केला. याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घेराव घातला. तसेच नराधमाला तातडीने ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर दगडफेक केली. या दगडफेकीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस आणि गृहरक्षक दलाचे काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही काही युवक जखमी झाल्याची माहिती आहे. जमावाच्या आक्रमकतेमुळे परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या. तसेच शेजारील पोलीस ठाण्यातूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाला शांत करण्याचाही प्रयत्न केला. सध्या पोलीस या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ उडाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group